ladaki bahin ekyc rule पुन्हा EKYC कोनत्या महीलांनी करायची ? दररोज येतोय नवाच नियम ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ज्या पात्र महिला लाभार्थींच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत काही चुका झाल्या आहेत किंवा ज्यांना आपली केवायसी पूर्ण झाली की नाही, याबद्दल संभ्रम आहे, अशा महिलांना मोठी संधी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसी आवश्यक असून, याच प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी हा जीआर घेण्यात आला आहे. विशेषतः विधवा, अविवाहित, एकल आणि घटस्फोटीत महिलांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया आणि अंतिम मुदत ladaki bahin ekyc rule
ज्या महिलांनी यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी केली आहे, परंतु अर्ज करताना किंवा पर्याय निवडताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांना आता अधिकृत पोर्टलवर पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट gov डॉट in’ या वेब पोर्टलवर ही सुविधा ‘वन टाईम एडिट’ (One-Time Edit) या पर्यायाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. ही संधी शेवटची आहे, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल किंवा पर्याय उपलब्ध होणार नाही, त्यामुळे पात्र महिलांनी काळजीपूर्वक आणि तातडीने ऑनलाईन केवायसी पूर्ण करून घ्यावी.
विधवा आणि घटस्फोटीत महिलांसाठी कागदपत्रांची विशेष प्रक्रिया
ज्या लाभार्थी महिला विधवा, अविवाहित, एकल किंवा घटस्फोटीत आहेत, त्यांच्यासाठी ई-केवायसी केल्यानंतर कागदपत्रे जमा करण्याची विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. अशा महिलांनी प्रथम ऑनलाईन ई-केवायसी पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे संबंधित अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे अनिवार्य आहे.
या आवश्यक कागदपत्रांमध्ये पती/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने राहणार आहे.






